जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सिंहाची शिकार झालेली तुम्ही कधी पाहिलीये का? हो तुम्ही बरोबर ऐकताय एका गरुडानं सिंहाची शिकार केल्याचा खतरनाक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. अशाच एका गरुडानं चक्क सिंहाला उचलून हवेत उडवलं आहे.
होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच. सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सिंहाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हा प्राणीही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र या प्राण्याची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.