डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण तीव्र झाली असून प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. गुरुवारी त्याने ८४.८८ असा प्रति डॉलर ऐतिहासिक नीचांक नोंदविला. आंतरबँक चलन व्यवहारात रुपया अखेर ४ पैशांनी घसरून ८४.८७ या नीचांकी पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरण, खनिज तेलाचा उडालेला भडका आणि भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा आणि गुंतलेला पैसा काढून घेण्याचा क्रम सुरू आहे. परिणामी डॉलरची मागणी वाढली असून, त्यापरिणामी रुपया अधिक कमजोर झाला आहे.